आओ पवन प्यारे (अनुवादित)
*घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात*
*माहेरी जा सुवासाची कर बरसात*
"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परि मन खंतावतं !
विसरली का ग भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं.
फिरुन-फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो.
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार !
परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय... !"
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला !
*-कृ. ब. निकुंभ*
************************
आओ पवन प्यारे
************************
आओ पवन प्यारे झूलो मेरे आँगना
प्रेम सुगंध प्यारी मायके में बरसाना..!!
सुख में है बेटी तेरी माई से कहना
पर भाई के लिए पड़े है तरसना..!!
भूल गए क्या माई भादो को साल बिता
मायके के सुख खातिर मन ये मानेना..!!
फिर फिर याद से दिल होवे दीवाना
चन्द्रकला केआँचल का छोर नित गीला..!!
बछिया काली कपिला की बदमाश गाये गाना
हूँम हूँम कर छेड़े मेरे गम का तराना..!!
पारिजातक की बहार पड़ती होगी आँगना
कब तेरे संग से मैं जावु उन्हें चुनना..!!
गोमाता कपिलाका दूध देता गाढ़ी मलाई
गहरी से गहरी प्रेम परछाई तेरी माई..!!
कण्ठ भर आये मेरा भर आये अखियाँ
तेरे मिलने को तरसी कितनी मैं मईयाँ..!!
अनुवाद--वृषाली सानप काळे
Comments
Post a Comment